पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड मौन सोडणार का?

संजय राठोड यांच्यासाठी पोहरादेवी गडावर महंतांकडून होमहवन 

Updated: Feb 23, 2021, 10:55 AM IST
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड मौन सोडणार का?

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) आरोप झाल्यावर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)  बंजारा समाजाच्या पोहरादेवी गडावर (Poharadevi) जात आहेत..थोड्याचवेळात यवतमाळच्या त्यांचा निवासस्थानावरून ते पोहरादेवी गडाकडे रवाना होत आहे. त्यादृष्टीनं निवासस्थानी लगबग सुरू झालीय. शासकीय वाहन देखील त्यांच्यासाठी पोहोचलं आहे. संजय राठोड यांचा हा शासकीय दौरा असला तरीही पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड मौन सोडणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.

संजय राठोड अजूनही त्यांच्या निवासस्थानी आहेत. तिथे त्यांची शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा सुरू आहे. तर पोहरादेवी गडावर संजय राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तसंच संत महंतांनी होमहवन सुरू केलं आहे.  वनमंत्री संजय राठोड यांची यवतमाळच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा सुरू, चर्चेनंतर पोहरादेवी गडाकडे रवाना होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. राठोड यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. 

संजय राठोडांवरील संकट दूर करण्यासाठी महंतांकडून पोहरादेवी मंदिरात होमहवन करण्यात येणार आहे. समर्थनार्थ होर्डिंग्ज तर सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी संस्थानने केली आहे. महंत जितेंद्र महाराज यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे. त्यामुळे राठोड आता चौकशीला सामोरं जातात का याची उत्सुकता आहे. 

पाच मिनिटं आधी वनमंत्री संजय राठोड यांचे मेवणे सचिन नाईक हे देखील त्याच्या निवासस्थानी दाखल झाले होते. वनमंत्री संजय राठोड आणि शिवसेना नेते, पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

वनमंत्री संजय राठोड थोड्याच वेळात संजय राठोड पोहरादेवीसाठी रवाना होतील. त्यांच्या निवासस्थानावर त्यादृष्टीनं लगबग सुरू झालीय. शासकीय वाहन देखील त्यांच्यासाठी पोहोचलंय. शिवसेना नेते-पदाधिकारी, नातेवाईक त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संजय राठोड यांच्यावरील ईडापिडा टळू दे, त्यांच्यावरील संकट दूर होऊ दे यासाठी पोहरादेवी गडावर महंतांकडून होमहवन केलं जातं आहे.  राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकल्याचं दिसून येत आहे. .