पुण्यात पुन्हा एकदा जाळपोळ, पोर्शे-ऑल्टोही पेटवून दिल्या

काही दिवसापूर्वीच धायरीत देखील अशी घटना घडली होती. ज्यात ३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या. पुन्हा हाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Updated: Apr 11, 2018, 04:44 PM IST

पुणे : नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून आणि त्यावर पोलिसांनीही वेळोवेळी कारवाई करूनही पुण्यातील गाड्यांच्या जाळपोळीचे सत्र थांबण्याचे चित्र नाही. पुण्यातील खडकी परिसरातील आलिशान पोर्शे आणि ऑल्टो गाड्यांची जाळपोळ केल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. या घटनेत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सोमवार रात्री २ अज्ञात व्यक्तींनी गाड्यांना आग लावली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालंय. खडकी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच धायरीतदेखील अशी घटना घडली होती. ज्यात ३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या. पुन्हा हाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

सोमवार रात्री २ अज्ञात व्यक्तींनी गाड्यांना आग लावली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालंय. खडकी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काही दिवसापूर्वीच धायरीतदेखील अशी घटना घडली होती. ज्यात ३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या. पुन्हा हाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.