राज्यात दोन दिवसांत कडक लॉकडाऊन शक्यता, परप्रांतीय मजुरांची धावपळ

 राज्यात कडक लॉकडाऊची शक्यता 

Updated: Apr 20, 2021, 07:26 AM IST
राज्यात दोन दिवसांत कडक लॉकडाऊन शक्यता, परप्रांतीय मजुरांची धावपळ

मुंबई : मुंबईसह (Mumbai Corona Cases) राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update) दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. संचारबंदी आणि कडक निर्बंध लादूनही नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसतायत. या पार्श्वभुमीवर कडक लॉकडाऊन करण्याच्या शासन तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊची शक्यता वर्तवली जातेय. याचा थेट परिणाम परप्रांतीय मजुरांवर झालाय. 

परप्रांतीय मजुरांची घरी पोहोच्यासाठी धावपळ सुरु झालीये. दरम्यान गोंदियातून मध्यप्रदेश आणि छत्तीसगढला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्यायत. त्यामुळे शेकडो मजुरांनी आपला गाव गाठण्यासाठी पायी प्रवास सुरू केलाय. 500 कीलोमीटरचं अंतर पायी चालत हे परप्रांतीय मजूर मध्यप्रदेश येथील मलाजखंड येथे जाण्यासाठी निघालेत. मलाजखंड जाण्यासाठी 10 दिवस लागतील असं ते सांगतात.

लसीकरण केंद्र बंद 

मुंबईत सलग दुस-या दिवशी खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली.31 खासगी लसीकरण केंद्र बंद आहेत. सोमवारी फक्त 35 हजार 309 नागरिकांचंच लसीकरण झालं. त्यातले दहा हजारजणांचं दुस-या डोससह लसीकरण पूर्ण झालंय. तिस-या टप्प्याच्या लसीकरणात साठा कमी पडल्यानं वेग मंदावला. मुंबईत सध्या 129 केंद्र आहेत. पालिकेची 39, राज्य आणि केंद्राची 17आणि खासगी 73 केंद्र आहेत.

पंतप्रधानांची बातचित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लस निर्मिती कंपन्यांशी बातचित करणार आहेत. सध्या देशात अनेक शहरांमध्ये लसींचा साठा अपुरा पडतोय. त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर सध्या उत्तर प्रदेशातील भयावह स्थितीबाबत पंतप्रधान आढावा घेतील. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी ते चर्चा करतील.