पोस्टनमन काकांचीही होणार बाईक 'राईड'... सायकलच्या घंटीचा आवाज कायमचा बंद?

पार्सल साठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या.पण आत्ता या ई बाईक मुळे काम सोपं झालं आहे.

Updated: Nov 3, 2022, 12:59 PM IST
पोस्टनमन काकांचीही होणार बाईक 'राईड'... सायकलच्या घंटीचा आवाज कायमचा बंद?  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता खाकी कपडे आणि सायकलची (Cycle) घंटी वाजवत, सुख:दुखाची खबरबात न चुकता पोहचविणारे पोस्टमन (Postman) आता 'ई- बाइक वरून टपाल वाटप करताना दिसणार आहेत. पोस्टाच्या पुणे  विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच 'ई-बाइक'च्या वापराचा प्रयोग सुरू केला गेला आहे. आज पर्यंत आपण पोस्टमन काका हे सायकल वर प्रवास करताना पहिला आहे. पण आत्ता पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा ई बाईक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  पुणे विभागाकडून या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्वावर सहा 'ई-बाइक' (E- Bike) वापरण्यात येत आहेत. पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी या दुचाकी वापरण्यात येत आहे. (postman will distribute parcel and courier on electric bike)

या ई बाईक मुळे कामाची गती तसेच पोस्टमन काका यांच्यात ऊर्जा देखील वाढली आहे मागच्या वर्षभरात चाळीस हजारांमध्ये पार्सल हे पोस्टमन काकाच्या द्वारे पाठवण्यात आले होते मात्र आता या ई बाईक मुळे यात वाढ होऊन ते 48 हजार पर्यंत पोहचलं आहे. ही सेवा पोस्टात पार्सल सेवेसाठी सध्या वापरली जातं आहे. पार्सल (Parcel) साठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या.पण आत्ता या ई बाईक मुळे काम सोपं झालं आहे. एका ई बाईक ला चार्जिंग केल्या नंतर 60 ते 70 किमी पर्यंत प्रवास केला जातो. यामुळे कोणतेही समस्या सध्यातरी येत नाहीये. तसेच पोस्टाच्या माध्यमातूनच सोलावरच पोस्टच्या कार्यालयात चार्जिंग (Charging Staion Near Me) स्टेशन उभारण्यात आल्याने स्टेशनमध्ये या ई बाईक ला चार्जिंग केलं जातं असल्याची माहिती देखील यावेळी जायभाये यांनी दिली.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

पुणे विभागात सुमारे 400 ते 500 पोस्टमन आहेत. शहरात येणारी पत्रे, पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या शासकीय नोटीस तसेच नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत पोस्टाकडून सेवा दिली जाते. ही सेवा देणारे पोस्टमन शहरात फिरण्यासाठी सायकल वापरतात तर काहीपोस्टमन आजही आसपासच्या भागात चालत पत्र पोहचवितात. ठराविक अंतरावर थांबावे लागत असल्याने त्यांच्याकडून पार्सल सेवेसाठी पोस्टमन काका कडून सायकलला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता केंद्र शासनाकडून ''ई-वाहनांना'' प्रोत्साहन दिले जात आहे. 

या मोहिमेला हातभार लावण्यासह वेगवेगळ्या सुविधा देत पोस्ट खात्यात आता लक्षणीय बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनसाठी ई-बाइक वापरण्यात येणार आहेत, त्याचा वापर राज्यात पुणे विभागातून सुरू करण्यात आला आहे.लवकरच याचा विचार करून राज्यभर तसेच प्रत्येक पोस्टमन काका यांना ई बाईक देण्याचा विचार आहे.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

ई-बाईक वरून सेवेची सुरुवात पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) विभागासाठी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सहा ई-बाइक पोस्टमनला देण्यात आल्या असून त्यामाध्यमातून आत्ता पार्सल घरोघरी दिली जात आहेत. एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महिन्याला सरासरी आठ ते दहा हजार पार्सल या वाहनांच्या माध्यमातून पोहचविली जात आहेत. तर लवकरच इतर पार्सल विभागांसाठी आणि त्यानंतर पोस्टमनसाठीही ई-बाइक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सोबतच पोस्टाच्या अनेक योजनांकडे सध्या नागरिकांचा कल वाढला असून पोस्टाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी तसेच विशेष करून सुकन्या योजनेला देखील मोठ्या प्रमाणत नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात आहे.