viral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Dec 2, 2022, 11:36 AM IST
viral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या title=
patoto news

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. आईनस्टाईननं झाडाच्या खाली बसल्यामुळे वरून सफरचंद पडल्यानं गुरूत्वाकर्षणाचा (gravity) शोध लावला त्यामुळे झाडाला असणाऱ्या फळांचंही (fruits and vegetables) महत्त्व काही कमी नाही हे यावरून स्पष्ट झालंच. हा एक प्रकारचा चमत्कारच होता. त्यानंतर आपल्या पृथ्वीवर (Magic) अनेक चमत्कार झाले आहेत. आताही त्याचा सिलसिला काही कमी नाही. अशाच काही दुर्मिळ घटनांनी (rare cases) आपल्या आयुष्यात एक वेगळीच मजा येते. सध्या आपल्या महाराष्ट्रातही असाच एक मजेशीर आणि चमत्कारिक प्रकार घडला आहे. (Potato Has Grown Above the Ground Surface in ambegaon Pune News marathi) 

बटाटा हे कंदमुळं (batata) आहे, असेच त्याचे वैशिष्ट्यं आहे कारण ते जमिनीखाली उगवते. पण हे बटाटे जेव्हा जमिनीच्यावर झाडाला येतात तेव्हा? आश्चर्य वाटलं ना?, पण हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला (tree) चक्क 18 ते 19 बटाटे लगडले आहेत. हे बटाटे.पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. 

हेही वाचा - सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या

कोण आहेत हे युवा शेतकरी 

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी बटाट्याची (potato news) लागवड केली आहे. बटाटा पीक काढणीला आलेला आहे. अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत आसताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क जमिनीच्या वर आल्याने त्यांना आश्चर्य वाटले.

लोकांची जमली गर्दी 

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही (market rates) बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याचा प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे. वर बटाटा आल्याने परिसरात हा कुतूहालाचा विषय होत असून परिसरात शेतकरी हा जमिनीवर आलेला बटाटा बघण्यासाठी (potato) गर्दी करू लागले आहेत.

असेही घडतात प्रयोग 

आजच्या आधुनिक शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग (experiments) घेतले जात आहेत. त्यातून अनेक युवा शेतकरी शेतीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक पारंपारिक ठराविक ऋतूत निघणारी पिके आता आधूनिकीकरणामुळे (globalization) सगळ्या ऋतूमध्ये घेता येऊ लागली आहेत. बटाटा हे शक्यतो मुरमाड जमिनीवर येणार पीक आहे. मात्र झाडाला जमिनीच्यावर आलेले बटाटे हा मात्र पहिलीच घटना घडली असावी. एका झाडाला 18 ते 19 बटाटे म्हंजे पीक सुद्धा तेवढ्याच जोमात आले आहे. आंबेगाव तालुक्यात जमिनीवर आलेल्या बटाटा बघण्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक गर्दी करू लागले आहेत. येणाऱ्या काळात जमिनीवर देखील बटाटा येऊ शकतो असे म्हंटले तर आश्चर्य वाटायला नको असेच हे उदाहरण म्हणावे लागेल.