ठाणे : खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन शर्मांनी जैस्वालांची भेट घेतली.
खंडणी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या दोन नगरसेवकांचं कनेक्श्न उघड झाल्याची चर्चा आहे. त्यांना चौकशीलाही बोलवण्यात येणार आहे. त्यासंदर्भातच ही भेट होती का याबाबदत चर्चांना जोर आलाय.
तर दुसरीकडं इकबाल कासकरवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातल्या नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 ते 16 लाखांची ज्वेलरी खंडणी रूपात मागितली होती. त्या अनुषंगाने इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा नोंदण्यात आलाय.