भुजबळांच्या सुटकेसाठी थेट शनिदेवाला साकडं

छगन भुजबळ यांची सुटका व्हावी, म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नस्तनपूर येथील शनिदेवाला साकड घातलं आहे.

Updated: Oct 15, 2017, 06:43 PM IST
भुजबळांच्या सुटकेसाठी थेट शनिदेवाला साकडं title=

मनमाड : एकेकाळचे शिवसेना नेते, राष्ट्रवादीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे. भुजबळ सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये आहेत. 

छगन भुजबळ यांची सुटका व्हावी, म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नस्तनपूर येथील शनिदेवाला साकड घातलं आहे.

नस्तनपूर हे अतिप्राचिन असं शनिदेवाचं मंदिर नाशिक जिल्ह्यात आहे. छगन भुजबळांच्या कार्यकाळात या मंदिर परिसराचा विकास करण्यात आला. 

भुजबळांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे दीडशे आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हे साहित्य वाटप झालं

ज्या छगन भुजबळांनी जिल्ह्याचा, तसेच या मंदिराचा विकास केला, त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना दिर्घायुष्य लाभो, यासाठी शनिदेवाला साकडे घालण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शनिदेवाला अभिषेक घातल्यानंतर महाआरती करण्यात आली.