दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

Updated: Oct 21, 2023, 08:59 PM IST
दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या (Gold) दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव ठरलाय.  सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रती तोळा झाले असून 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ झाली आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Hamas Conflict) सुरू असलेल्या युद्धाचा  सुवर्ण बाजारावर झाला असून आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. 

आतापर्यंतचा उच्चांकी भव
सुवर्ण नागरी जळगावच्या इतिहासामध्ये सोन्याचा भाव विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झालीय. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा अंतरराष्ट्रीय बाजारांवर झाला असून यामुळे सोन्याचे भावही वाढले आहेत. त्यातच स्थायी गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.  सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून आगामी काळात सोन्याचे दर हे 70  हजार रूपये प्रतितोळा होण्याची शक्यता देखील सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे

आज सोन्याचा भाव जीएसटी सहित 63 हजार रुपये प्रती तोळा तर चांदीचे भाव 76 हजार रुपये प्रतीकिलो आहेत.  दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेण्याची प्रथा असते, पण पुन्हा सोन्याचे दर वाढल्याने आमचे आर्थिक गणित बिघडले असून कमी सोनं खरेदी करावे लागत असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली करत आहेत. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायल-हमास युद्ध, क्रूडच्या किमतीत झालेली वाढ आणि सणासुदीच्या मागणीत झालेल्या वाढमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आली तर, चांदीमध्येही एक हजार रुपयांहून अधिकची तेजी राहिली.