कुंभनगरीतल्या पुजा-यांवर आयकर विभागाची नजर

कुंभनगरी नाशिकमध्ये अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजा-यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आता आयकर विभागाने इथल्या पुजा-यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवलं आहे. 

Updated: Sep 25, 2017, 08:50 AM IST
कुंभनगरीतल्या पुजा-यांवर आयकर विभागाची नजर

नाशिक : कुंभनगरी नाशिकमध्ये अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजा-यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आता आयकर विभागाने इथल्या पुजा-यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवलं आहे. 

यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे कमवून आयकर भरायला टाळाटाळ करणारे पुजारी विशेषत्वाने आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 

काळ्या पैशाचे स्रोत बंद करण्यासाठी आयकर विभाग, राज्यातील सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्य आयकर आयुक्तांनी सर्व पुजा-यांना आयकर भरण्याच्या सूचना केल्या आहेत.