नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरची संख्या कमी असल्यानं, आतापर्यंत अनेक बालमृत्यू झाले आहेत. यावरुन गदारोळ माजल्यानंतर तीन आठवड्यात जिल्हा रुग्णालयात एन सी आय यू कार्यरत करण्याचे आदेश आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिले होते. तर आता पालकमंत्री गिरीश महाजनांनीही जिल्हा रुग्णालय सुस्थितीत चालावं यासाठी प्रयत्नरत असल्याचं सांगितलंय.