पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रम बंदीचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आलाय. वाद झाल्यानंतर निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवलीय.
शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रम घ्यायला महापालिका आयुक्तांनी मनाई केली होती. या परिसरात होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आयुक्तांच्या या निर्णयाला महापौरांनी विरोध दर्शवला होता.
शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालणं हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना नसून मुख्य सभेला असल्याचा दावा महापौर आणि उपमहापौरांनी केला होता. त्यामुळे अवघ्या काही तासांत हा बंदी निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवलीय.
३१ डिसेंबर रोजी याच शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद झाली होती. तिला काही संघटनांनी विरोध केला होता. आयुक्तांच्या निर्णयामागे एल्गार परिषदेच्या वादाचं कारण होतं अशी चर्चाही रंगली होती.