अहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना आज शिक्षा सुनावणार

अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. गुरुवारी सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला. 

Updated: Jan 20, 2018, 08:46 AM IST
अहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना आज शिक्षा सुनावणार title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांडातील सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. गुरुवारी सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला. 

दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्व निकम यांनी केली. तर कोर्टानं आरोपींचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यामुळं या दोषींना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. नेवासा तालुक्यातल्या सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं 2013च्या जानेवारीत सचिन सोहनलाल, संदीप राजू थनवार आणि राहुल कंडारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघे कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायचीय असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलावण्यात आलं. धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले. तर घारु याचं मुंडकं आणि हातपाय तोडण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना दोषी ठरवण्यात आलंय. तर अशोक फलकेला निर्दोष ठरवण्यात आलंय.