अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ

 महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे. 

Updated: Oct 6, 2020, 07:22 PM IST
अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ  title=

नागपूर : मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नका, त्या पुढे ढकला अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाला कोणताही विरोध नाही, पण हा प्रश्न केवळ एका जातीचा नाही तर ओबीसींच्या ३८० जातींचा आहे. यात सर्व जातीतील विद्यार्थी अॅडमिशनमुळे अडकले आहे. शासनाने लकरात लवकर सोडवायला पाहिजे, अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे. यापूर्वीच्या शासनने जी भूमिका घेतली होती, त्याला सर्वोच्च न्यायलयाची भूमिका पूरक नसल्याने प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याचे  ओबीसी महासंघने म्हटले आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण स्थगितीनंतर आक्रमकपणा धारण केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.  

6\

याशिवाय कोरोना परिस्थीतीत कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नाही. परीक्षेसाठीची साधने उपलब्ध नाहीत.  कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार, या मुद्द्यांकडे मेटे यांनी लक्ष वेधलं आहे आहे.