बुलेट ट्रेनसाठी जागेचा प्रस्ताव ठाणे महापालिकेत मंजुरीच्या प्रतिक्षेत

आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला.

Updated: Dec 18, 2020, 03:06 PM IST
बुलेट ट्रेनसाठी जागेचा प्रस्ताव ठाणे महापालिकेत मंजुरीच्या प्रतिक्षेत title=

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे महापालिकेच्या मालकीची जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेण्यात आला आहे. आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र अद्याप तो मंजूर होऊ शकलेला नाही. मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो.

ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे प्रस्तावा मंजुरी मिळते का? त्यावर शिवसेना काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेन मुंबईकरांच्या फायद्याची नसल्याचं म्हटले होते. त्यामुळे शिवसेवेच्या भूमिकेवर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे सभागृहात हा प्रस्ताव मंजुर होतो की नाही. याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.