ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे. 

Updated: Sep 3, 2017, 08:36 PM IST
ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या title=

ठाणे : ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,  श्रद्धा लाड या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या पेशानं मानसोपचारतज्ज्ञ होत्या.

 दरम्यान काल संध्याकाळी त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते, आणि मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे. 

ठाण्यात नौपाडा परिसरातील टेकडी बंगाल येते राहात असलेल्या या महिला डॉक्टरनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मात्र लाड यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. श्रद्धा लाड यांना २ मुलं आहेत. गेली १२ वर्ष त्या नर्सरी स्कुल चालवत होत्या.