धक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 3, 2017, 02:43 PM IST
धक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या title=

ठाणे : एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.

ठाण्यातील नौपाडा परिसरात टेकडी बंगला येथे श्रद्धा लाड आपल्या परिवारासोबत राहात असत. दरम्यान, काही कामानिमित्त पती बाहेर गेले असता श्रद्धा यांनी गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. या वेळी घरात कुणीही नव्हते.
प्राप्त माहितीनुसार, पेशाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या लाड या नर्सरी स्कुल चालवत होत्या. गेली १२ वर्षे त्या स्कुलचे कामकाज पाहात असत. त्यांच्या पश्चात पती, २ मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.