पुण्यातील धायरीमध्ये सिंलेंडर झाला लिक, त्यानंतर...

पुण्यातून मोठी बातमी समोर!

Updated: Dec 17, 2022, 11:46 PM IST
पुण्यातील धायरीमध्ये सिंलेंडर झाला लिक, त्यानंतर...  title=

Pune Fire Dhayari : पुण्यातील धायरी डिएसके विश्वजवळ गणेश नक्षत्र को ऑप सोसायटीमध्ये इमारतीच्या 11 व्या मजल्यावर सदनिकेमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच नवले व सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आलं.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी इमारतीच्या 11 व्या मजल्यावर सदनिकेमधे आग लागल्याचे कळताच जवानांनी धाव घेत सदनिकेत प्रवेश केला असता तिथे स्वयंपाक घरात घरगुती वापराच्या सिलेंडरमधून वायू गळती होऊन आग लागली होती. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली आणि घरातील इतर दोन सिलेंडर बाहेर काढत धोका दुर केला. 

सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागून घरातील आरती राहुल साळवी  जखमी झाल्या असून त्यांना वाचवायला धावलेले राहुल दिलिप साळवी यांना देखील आगीची झळ लागली आहे. सदर दोन जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. या आगीमुळे स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले आहे. 

दरम्यान, या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व तांडेल शिवाजी मुजूमले जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे विक्रम मच्छिंद्र, औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी सहभाग घेतला.