Pune Bypoll : पुण्यात भाजपचं टेन्शन वाढले; गिरीश बापट प्रचारापासून लांब तर संजय काकडे अलिप्त

political News : पुण्यातील कसबा पेट विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Pet Assembly By-Election) नाराजी नाट्य सुरु दिसून येत आहे. (Kasba Pet  Bypoll ) महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

Updated: Feb 16, 2023, 12:44 PM IST
Pune Bypoll : पुण्यात भाजपचं टेन्शन वाढले; गिरीश बापट प्रचारापासून लांब तर संजय काकडे अलिप्त title=

Maharashtra political News : पुण्यातील कसबा पेट विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Pet Assembly By-Election) नाराजी नाट्य सुरु दिसून येत आहे. (Kasba Pet  Bypoll ) महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपचे टेन्शन वाढले आहे. (political News) कारण गिरीश बापट ( Girish Bapat ) यांनी पत्र लिहून तब्बेतीचे कारण देत प्रचारापासून लांब राहिले आहे. तर भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade ) ही अलिप्त आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे. (Pune Bypoll News In Marathi)

खासदार गिरीश बापट प्रचारापासून लांब राहणार आहेत. तब्येतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी होऊ शकत नाही, असं पत्र गिरीश बापट यांनी लिहिलं आहे. त्यामुळे गिरीश बापट नाराज असल्याच्या चर्चा आता पुण्यात रंगू लागल्या आहेत. खरंतर कसबा विधानसभेसाठी गिरीश बापट हे आपल्या सुनेला उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याची देखील बातमी आली होती. पण तसं न झाल्याने गिरीश बापट प्रचारापासून लांब आहेत असं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे. कसबा मतदारसंघातून गिरीश बापट सहा वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे कसब्यात गिरीश बापटांचे वलय मोठं आहे. जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते संजय काकडे देखील प्रचारापासून लांब असल्यामुळे चर्चेला उधाण आला आहे

दरम्यान, कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. रणनीती ठरवण्यासाठी मॅरेथॉन बैठकांवर जोर दिला आहे.  भाजपने काल 7 तास मॅरेथॉन बैठका घेतल्या. फडणवीसांच्या बैठकीत भाजपाच्या वरिष्ठ नेते, पुण्यातील उद्योजक, व्यापारी उपस्थित होते...कसबा, चिंचवडबाबत भाजपाची निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी या बैठका घेण्यात आल्या...पुण्यातील बडे उद्योजक पुनीत बालन आणि फतेचंद रांका यांच्यासोबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला अनेक गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी देखील उपस्थिती लावली होती...या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी स्वतः आता कसबा विधानसभेत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.