पुणे : Sidhu Moose Wala News Updates : पंजाबच्या (Punjab)प्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला (Sidhu Moose Wala)याच्या हत्येचे पुणे कनेक्शन पुढे आले आहे. दोन आरोपी पुण्याचे असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. पुण्याच्या दोन्ही संशयितांचे फोटो 'झी 24 तास'च्या हाती लागले आहेत. सौरव आणि संतोष जाधव अशी दोघांची नावं आहेत. दोन्ही संशयितांचा सध्या जोरदार शोध सुरु आहे.
पंजाबमधील काँग्रेसचा (Congress) नेता सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) अशीही त्याची ओळख होती. सिद्धूच्या हत्येबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच त्यांच्या हत्येमागे गँगवॉर हेच कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याचबरोर मागील वर्षी अकाली दलाच्या तरुण नेत्याची हत्येचही कनेक्शन असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटिव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल माहिती दिली होती.
विक्रमजितसिंह ऊर्फ विकी मिड्डुखेरा याची मागील वर्षी 7 ऑगस्टला हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात सिद्धूचा मॅनेजर शगुनप्रीतसिंग याचे समोर आले होते. त्याने कौशल गँगला सुपारी देत ही हत्या घडवून आणल्याची चर्चा होती. यानंतर तो ऑस्ट्रेलियाला पळून गेला. या हत्येचा सूड उगवण्यासाठी सिद्धूची हत्या करण्यात आली. हा प्रकार दोन गँगमधील वादातून झाला आहे. यामागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.
तर दुसरीकडे सिने अभिनेता सलमान खानला हत्येची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मूसेवालाप्रमाणं हत्या करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. सलमानचे वडील सलीम खान वांद्रे बँडस्टँडवर जॉगिंगला गेले होते. ते बेंचवर बसले असताना, कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्यांना हे धमकीचं पत्र दिलं. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केलीयआहे. अलिकडेच पंजाबमध्ये सिद्धू मूसेवाला या गायकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमान खानलाही तसंच ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.