सागर आव्हाड, झी मराठी, पुणे : पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न असा विचारला जात आहे. दहशत (Terror) पसरवण्यासाठी टोळक्यांकडून (Goons) कोयत्याचा धाक दाखवणं, गाड्या फोडणं असे प्रकार सर्रास सुरु आहेत. शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली असून पुण्यातील वनविश वस्ती, तळजाई पठार, आणि कर्वेनगर परिसरातील रस्ता लगत पार्किंग केलेल्या पंधरा ते वीस गाड्यांची अज्ञात्यांनी तोडफोड केली. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने धुडगूस घालत या गाड्या फोडल्या आहेत. कर्वेनगरमध्ये (Karve Nagar) दहा गाड्या फोडल्या असून दोन्ही ठिकाणच्या गाड्या फोडणाऱ्या (Cars Vandalized) आरोपीला वारजे पोलिसांनी अटक केली .आज त्याची कर्वेनगर परिसरात धिंड काढली.
सहकारनगरमध्ये गुंडांची दहशत
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुंडांनी पुन्हा एकदा दहशत पसरवली. तळजाई परिसरातील वनशिव वस्तीमध्ये तोंड बांधून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने पार्क केलेल्या जवळपास 40 वाहनांची तोडफोड केली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण वनशिव वस्ती परिसरात दहशत पसरली आहे. सहा जणांचा हे टोक एका व्यक्तीला शोधण्यासाठी तळजाई परिसरात आज पहाटेच्या सुमारास शिरले होते. ही व्यक्ती न सापडल्याने त्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दिसेल त्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हातातील कोयते, लोखंडी गज, लाठ्यांच्या सहाय्याने त्यांनी दुचाकी आणि रिक्षांची प्रचंड तोडफोड केली. तोडफोड करत असताना हे टोळके प्रचंड आरडाओरडा करत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिक ही प्रचंड घाबरले होते.या टोळक्याच्या हातात कोयत्यासारखे घातक शस्त्र असल्याने कुणीही बाहेर येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. या टोळक्याने परिसरातील घरावरही दगडफेक केली. या घटनेत 10 ते 15 रिक्षा, 25 दुचाकी, काही कार यांचे नुकसान झालं आहे.
गरीब नागरिकांचं नुकसान
वारजे परिसरात काल सात गाड्यांची तोडफोड झाली होती. सलग दोन दिवस तळजाई परिसरात दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन इथं तक्रार दाखल झाली आहे. बांधकाम मजूर, पेंटर, पथारी व्यावसायिक, कचरावेचक, रिक्षाचालक, टेंपोचालक अशा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह या वाहनांवरच चालतो. मात्र, त्याच वाहनांची तोडफोड झाल्यामुळे आता ते नुकसान कोठून व कसे भरून काढायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. दोन दिवस धंदा बुडणार लागणारा खर्च कसा जमा करायचा असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्याने धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली, हे नुकसान पोलिसांनी आरोपीकडून वसूल करून आम्हाला भरून द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या आरोपींचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, हा आरोपी रेकॉर्ड वरचा आहे सहकार नगर आणि वारजे इथे पुण्यातील हाच आरोपी असून त्याला अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी दिली. पप्पूल्या वाघमारे असा आरोपीचे नाव असून त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई यापूर्वी झाली होती पुन्हा त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली जाईल त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.