Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. (Pune Crime News) यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News ) रुग्णालयात हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.

Updated: Feb 25, 2023, 11:39 AM IST
Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी title=
Pune Crime News

Pune Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दोन गटांत हाणामारी झाली आहे. (Crime News) दोन टोळक्यांनी ससूनमध्ये येत एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवली. (Pune News ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराईतांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील सराईत हडपसर पोलीस ठाण्यात गेले. ( Clash between two groups in Sassoon Hospital premises in Pune)

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी देखील त्यांच्या सोबत होते. दरम्यान, रुग्णालयाच्या ओपीडी बाहेर दोन टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार कोयते घेऊन एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे अचानक गोंधळ उडाला. 

या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक घाबरून पळून जाऊ लागले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही गटातील आरोपींना अटक केली. तर काही आरोपी फरार झालेत...या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले.