Pune Drugs : पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात (Pune Drugs Case) एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने 40 ते 50 जणांचा शोध घेतला जातोय. ड्रग्ज घेणारी अल्पवयीन मुलं होती का...? याचा तपास केला जातोय. तसंच अशा प्रकारे कोणत्या बारमध्ये ड्रग्ज पार्ट्या झाल्यायत का हेदेखील पाहिलं जातंय. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल केलाय. आता व्हिडिओत दिसणाऱ्यांचा शोध लागल्यानंतर आणखी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यताय.
दादा विरुद्ध दादा
पुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा विरुद्ध दादा वाद रंगलाय.. पुण्यात सुरू असलेले ड्रग आणि अवैध धंदे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकाळात सुरू असल्याचं आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे. याला राष्ट्रवादी अजित पवार गटानंही जोरदार पलटवार केलाय.. अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं, हे सगळे अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू होते. उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनीही पोलिसांसह सरकारवर निशाणा साधलाय. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय. तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय. पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय, असा निशाणा जयंत पाटलांनी साधलाय...
पुणे पोलिसांची कारवाई
दरम्यान, पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केलीय. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. पुण्यात अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केलंय. एक-दोन अधिकारीच नाही तर सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.
एल3 बारची तोडफोड
पुण्यातील एल 3 बारची तोडफोड करण्यात आलीय...पतित पावन संघटनेकडून बारची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय. याच बारमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेनं या बारची तोडफोड केलीय. ड्रग्ज प्रकरणानंतर बार सील करण्यात आलाय.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.