Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Pravin Dabholkar | Updated: Aug 24, 2024, 03:35 PM IST
Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर  title=
पुण्यात पौडजवळ कोसळले हेलिकॉप्टर

Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हेलिकॉप्टरच्या पायलटसह दोघेजण जखमी झाले आहेत.अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मुळशी तालुक्यातील कोंडावडे या गावात हे हॅलिकॉप्टर कोसळले.ग्लोबल हेक्ट्रा  या कंपनीचे AW 139 नावाचे हे हॅलिकॉप्टर आहे. यामध्ये  कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. दिर भाटिया,अमरदीप सिंग आणि एस पी राम यांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला जात होते.