Pune Porche Accident: पुणे कल्याणनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत मोटरसायकलवरुन येणाऱ्या दोन जणांना धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. सध्या अल्पवयीन मुलाच्या पालक पोलिस कोठडीत आहेत. तर, मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या पालकांनी एक मागणी केली आहे.
कल्याणीनगर येथे अपघात घडल्यानंतर तेथील नागरिकांनी मुलाला पोर्शे कारमधून खेचून बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. अल्पवयीन मुलाला मारहाण करणारे नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुलाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे. अपघातानंतर मुलाला केलेल्या मारहाणीत मुलाच्या डोळ्याला, पाठीवर तसेच गुप्तांगाला इजा झाली होती, असा दावा मुलाच्या पालकांनी केला आहे..
दरम्यान, अपघात घडला त्या दिवशीचे बॉलर पब, पार्किंग तसेच लगतच्या गल्लीतील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे पब मधील बिल मिळावे अशी मागणी अल्पवयीन आरोपीच्या वकिलांकडून बाल न्याय मंडळाकडे करण्यात आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण तरुणी बॉलर पंप मधून बाहेर पडले होते. त्यांच्या विषयीची माहिती आरोपींच्या वकिलांना हवी आहे.
दारू पिऊन गाडी चालवत असताना दोघांचा बळी घेतलेल्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल निरीक्षण गृहात करण्यात आली होती. त्याला पाच जून पर्यंत ज्या ठिकाणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्याचं समुपदेशन पूर्ण झालेलं नाही. त्याचप्रमाणे बाहेर त्याच्या जीविताला धोका असल्याच सांगत त्याला आणखी 14 दिवस निरीक्षण गृहात ठेवण्यात यावं, अशी विनंती पुणे पोलिसांकडून 3 जून रोजी करण्यात आली होती. त्यावर मुलाला 12 जूनपर्यंत निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिले होते. त्यानुसार मुलाला निरीक्षणगृहात ठेवण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे आज पोलीस काय मागणी करतात आणि बाल न्याय मंडळ त्यावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे