फिरायला गेलेली पुण्यातली दोन कुटूंब बेपत्ता

 पारनेर फिरण्यासाठी निघाले होते.

Updated: Aug 23, 2018, 11:49 AM IST

पुणे : हडपसर पुणे येथे राहणारी ही दोन्ही कुटूंब असून दोन्ही कुटुंब प्रमुख हे जमिन खरेदी विक्री करणारे आहेत. हडपसर येथे राहणारे सिध्दार्थ उर्फ रिश मगर आणि त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबीयांसमवेत  पारनेर फिरण्यासाठी निघाले होते. त्यांनी खडकवास येथील अक्वेरीयस या हॉटेल मध्ये मुक्कामही केला. त्यानंतर मगर यांच्या पत्नीने त्यांच्या बहिणीला फोन करुन काल दुपारी ११ वाजता माहितीही दिली.

मोबाईल बंद 

नंतर मात्र या दोन्ही कुटुंबाचे पाच मोबाईल नंबर हे बंद असल्याचे समजले. या बाबत रात्री उशीरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस या दोन्ही कुटूंबाचा शोध घेत आहेत.