Girish Bapat Passed Away: पुण्याच्या राजकारणातील 'चाणक्य' हरपला, गिरीश बापट यांचं निधन

Girish Bapat passed away: पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होते. सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. उपचार सुरू असताना गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 

Updated: Mar 29, 2023, 01:15 PM IST
Girish Bapat Passed Away: पुण्याच्या राजकारणातील 'चाणक्य' हरपला, गिरीश बापट यांचं निधन title=

Girish Bapat passed away : पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली होती. अखेर गिरीश बापट यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख होती. गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास केला. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात दाखल होते. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

गिरीश बापट यांची प्रकृती आज सकाळपासून अधिकच ढासळली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाच्या आजार जडला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरु होते. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. 

कसबा पेठ मतदारसंघात एकहाती वर्चस्व

गिरीश बापट यांचे कसबा पेठ मतदारसंघात एकहाती वर्चस्व होते. गेली 25 वर्ष बापट आणि कसबा हे एकमेव समीकरण झाले होते. मतदार संघात काय चाललंय याची इतंभूत बातमी असायची. त्याचा उत्तम जनसंपर्क होता. बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. नगरसेवक ते खासदार अशी चढत्या क्रमाची कारकीर्द राहिली. 1995 पासून 5 वेळा आमदार म्हणून कसब्यातून निवडून आले. तर 2019 मध्ये खासदारपदी निवड झाली. कसब्याचे सध्याचे आमदार रवींद्र धंगेकरांना हरवून बापटांनी कसबा पेठ मतदारसंघ आपल्याकडे राखल होता.

खासदार बापट यांचा अल्प परिचय

खासदार गिरीश बापट हे ' भाऊ ' म्हणून पुणेकरांमध्ये परिचित होते. टेल्कोचे कामगार ते पुण्याचे खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. बापट यांचा जन्म तळेगाव दाभाडे इथला आहे.

- जन्म- तळेगाव दाभाडे 3 सप्टेंबर 1950
- टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश.
- 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवड.
-1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव.
- मात्र 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी.

- राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम.
- 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवड.  
- मात्र त्यानंतर दुर्धर आजाराने गिरीश बापट आजारी.  मात्र आजारपणातही गिरीश बापट राजकारणात सक्रिय.  

-नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी व्हीलचेअर बसून आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास घ्यावा लागत असताना देखील पक्षासाठी प्रचारात सक्रिय.  
-गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते.  हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य