पुणे-नगर महामार्गावर विचित्र भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची कार आणि दोन बाईकला धडक, विचित्र अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू   

Updated: Jan 23, 2022, 08:54 PM IST
पुणे-नगर महामार्गावर विचित्र भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू title=

हेमंत चापुडे झी 24 तास शिक्रापूर : पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शिक्रापूर इथे झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 4 जणांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील 24 वा मैल इथे भीषण अपघात झाला. ट्रकने कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात घडला. ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. तर फोर व्हीलर वाहन आणि दोन्ही टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते.

ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला. या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातामुळे मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.