धक्कादायक! 15 लाखात किडनीचा सौदा, असा झाला किडनी रॅकेटचा पर्दाफाश

महिलेला 15 लाखांचं आमिष दाखवून शस्त्रक्रिया केली आणि नंतर पैसे देण्यास नकार, पुण्यातील घटनेने खळबळ

Updated: May 12, 2022, 02:00 PM IST
धक्कादायक! 15 लाखात किडनीचा सौदा, असा झाला किडनी रॅकेटचा पर्दाफाश title=

पुणे : पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यातील नामांकित हॉस्पीटलचा या सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. 

पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केलाय. एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवलाय. 

रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. 

त्यानंतर तिने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.