पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' फोटो पाहून संतापला; बिहारमधून पुण्यात आला अन्...; सरकारी शिक्षकाचे कृत्य हादरवणारे

Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्... 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 19, 2024, 09:31 AM IST
पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' फोटो पाहून संतापला; बिहारमधून पुण्यात आला अन्...; सरकारी शिक्षकाचे कृत्य हादरवणारे title=
Pune news Man having love affair with woman murdered by her husband

Pune Crime News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून थरारक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पत्नीचा बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने त्याच्या साथीदारासह हत्येचा कट रचला. 

पोलिसांनी राजीव कुमार आणि धीरज कुमार यांना अटक केली आहे. राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. तर, त्याचे पत्नीसोबत अनेक दिवसांपासून वाद आहेत. दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. याच तणावातून राजीवने ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

राजीव कुमारने त्याच्या पत्नीचा प्रियकरासोबतचा फोटो पाहिला होता. प्रवीणकुमार महतो असं मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रविण आणि राजीवच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. तर, राजीव हा बिहार येथील रहिवाशी होता. बिहारमध्ये तो सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याला प्रवीणकुमार बद्दल कळताच त्याने त्याची हत्या करण्याचा कट रचला. 

बिहारमधून तो सोमवारी पुण्यात दाखल झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास प्रवीण जिथे काम करतो तिथे तो व त्याचा सहकारी पोहोचले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने राजीवकुमारचा गळा चिरला. त्यानंतर ते बिहारला जाण्यासाठी रवाना झाले. मात्र तेव्हाच पुणे पोलिसांनी हत्येची खबर मिळाली. त्यांनी चौकशी केली असता त्यांना अनैतिक संबंधांबाबत कळलं. तेव्हा त्यांनी राजीवची चौकशी केली. त्याचे लोकशन तपासत असताना तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आले. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीने बुधवारी सकाळी राजीव व त्याचा सहकारी धीरजला ताब्यात घेतलं. अवघ्या 9 तासांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. तसंच, प्रवीणच्या हत्येनंतर तो बिहारला जाऊन पत्नीचीही हत्या करणार असल्याचे चौकशीत समोर आले होते. मात्र, पोलिसांनी आरोपीला पकडल्याने त्याच्या पत्नीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, एका सरकारी शिक्षकाने हत्येचा गुन्हा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.