Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा

Mhada Lottery News : अरे व्वा! म्हाडाच्या घरांच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी. 4 हजारांहून अधिक घरांपैकी एकाचे मालक तुम्हीही होऊ शकता...   

सायली पाटील | Updated: Mar 13, 2024, 11:43 AM IST
Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा  title=
Pune news mhada Lottery 2024 Apply Now for 4777 Houses know the rates and diposit rate latest update

Mhada Lottert News : हक्काचं घर असावं असं  जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपली कर्मभूमी असणाऱ्या शहरांमध्ये हक्काचं घर असणं ही अतिशय सोयीची बाब. या स्वप्नपूर्तीसाठी अनेकदण जीव ओतून काम करतात, पैसे साठवतात. घरांच्या किंमतींवर लक्ष ठेवून असतात आणि अपेक्षिक संधी, हवं तसं घर मिळालं की लगेचच या संधीचं सोनं करतात. घराचं स्वप्न साकारण्यच्या दिशेनं तुमचीही वाटचाल सुरु आहे का? ही बातमी तुमच्यासाठी. 

सर्व उत्पन्न गटातील नागरिकांना परवडेल अशा विविध गटांनुसार विविध क्षेत्रफळाची घरं उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडानं अशीच एक संधी पुन्हा अनेकांना दिली आहे. पुणेकरांसाठी ही संधी अतिशय महत्त्वाची असून, Pune Mhada Lottery 2024 अंतर्गत 4,777 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रियाही सुरु झाली आहे. 

हेसुद्धा वाचा : Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार? 

7 मार्च 2024 रोजीच पुणे म्हाडाच्या वतीनं या सोडतीची घोषणा करण्यात आली. ज्याअंतर्गत पुणे, (Satara) सातारा, सांगली, कोल्हापूर (Kolhapur) आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही घरं उपलब्ध राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये एकट्या पुण्यातील घरांची संख्या 745 असून, पिंपरी चिंचवडमध्ये 561 घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. 

अर्ज प्रक्रियेसाठीच्या महत्त्वाच्या तारखा 

सदर नोंदणी प्रक्रियेसाठी 8 मार्च 2024 ला दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज नोंदणीची सुरुवात झाली आहे. 8 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणीची प्रक्रिया पार पडेल. तर, 10 एप्रिल 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जातील. अर्जदारांनी 12 एप्रिलपर्यंत अनामत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित असेल. दरम्यान घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर भेट द्यावी. प्रथम येणाऱ्या प्राधान्य असणाऱ्या या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही lottery.mhada.gov.in वर नोंदणी करू शकता. 

म्हाडाच्या या गृहयोजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. या योजनेदरम्यान म्हाडाकडून एकूण 18 बहुविध योजना जारी केल्या आहेत. याअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी 59 राखीव घरं, पंतप्रधान आवास योजना Private Partnership Scheme (PPP) साठी 978 राखीव घरं अशी साधारण विभागणी असून उर्वरित घरं अर्जदारांना उपलब्ध करून देत विजेत्यांची नावं सोडतीत जाहीर केली जाणार आहेत.