गोड संसाराची स्वप्नं पहिल्याच दिवशी विस्कटली, खंडेरायाच्या दर्शनाआधी नवदाम्पत्याचा करुण अंत

खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या नवदांपत्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे नवदाम्पत्य देवदर्शनसाठी रिक्षाने जात होतं, पण रिक्षा विहिरीत कोसळली आणि नवरा-नवरीसह आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने सासवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

निलेश खरमारे | Updated: Sep 26, 2023, 05:51 PM IST
गोड संसाराची स्वप्नं पहिल्याच दिवशी विस्कटली, खंडेरायाच्या दर्शनाआधी नवदाम्पत्याचा करुण अंत title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : सुखी संसाराची गोड स्वप्न पाहणाऱ्या नवदाम्पत्याचा (Newlywed Couple) संसार सुरु होण्यापूर्वीच दुर्देवी अंत झाला. पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये (Saswad) ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जेजुरीच्या देवदर्शनासाठी आलेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवड जवळ विहिरीत पडलयाने नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू (Tragic Accident) झाला. तर दोन जणांना वाचवण्यात पोलिसांना आलं. पुण्यातील धायरी इथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नव विवांहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरगावकेमळा इथं रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली.

या अपघातात नवरा-नवरी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या  नव दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 25 सप्टेंबर म्हणजे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
नव विवहितांचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीय असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे कुटुंब चिंतेत होतं.  आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला.. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या.  ही माहिती तरुणांनी सासवड पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघांना सुखरुप बाहेर काढलं. पण दुर्देवाने नवविहाहीत जोडप्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर रिक्षातील आणखी एका मुलीचाही उपचाराआधी मृत्यू झाला. या अपघातात रिक्षाचा चालक आणि एक महिला बचावली आहे. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने हे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलसांनी दिली आहे. 

शहापूरजवळ भीषण अपघात
राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बसला जोरधार धडक दिली. या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी बचावले मात्र शिवशाही बसच्या समोरील कॅबिनचा चेंदामेंदा झाला. अपघात घडल्या नंतर सार्वजनिक आदर्श गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.या घटनेची नोंद जवाहर नगर पोलिस स्टेशन इथं करण्यात आली आहे.