बायकोने नवऱ्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला 'असा' ईमेल पाठवला की पोलिसही हादरले

पती वेळ देत नसल्याने पत्नीने असं धक्कादायक कृत्य केले की कुणी कल्पनाही करु शकत नाही. पती पत्नीच्या या वादाचा पोलिसांच्या डोक्याला चांगलाचा ताप झाला. 

Updated: Jun 15, 2023, 04:39 PM IST
बायकोने नवऱ्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला 'असा' ईमेल पाठवला की पोलिसही हादरले  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रागाच्या भरात कोण काय केरल याचा काही नेम नाही. अशीटच एक धक्कादायक घटना पुण्याक घडली आहे. पतीला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने असं काही केलं की पोलिसांच्या देखील डोक्याला ताप झाला. नवरा वेळ देत नसल्याने संत्पत झालेल्या या पत्नीने त्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला खळबळजनक मेल पाठवला. यामुळे कंपनी मॅनेजमेंट हादरले (pune crime). 

पती पत्नीमधली वादावादी ही तशी सामान्य गोष्ट आहे.  सगळ्याच घरात कुरबुरी होतात. पण पती वेळ देत नाही म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी थेट पती काम करत असलेल्या कंपनीला त्याच्याच मेल आयडीवरून कंपनी बॉम्बने उडवून देण्याची धमकी या महिलेने मेलद्वारे दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. चंदननगर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

घर म्हटल्यांवर भांड्याला भांड लागणारच. प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद विवाद होत असतात.  नवरा बायकोमधील वाद म्हणजे पेल्यातल वादळ. मात्र, पुण्यातील चंदन नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीने पती काम करत असलेल्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याच्यात मेल आयडीवरुन तिने हा मेल पाठवला आहे. 

महिला उच्च शिक्षित

पतीला धडा शिकवण्यासाठी भयानक कृत्य करमारी ही महिला उच्च शिक्षित आहे. ती ट्युशन टीचर देखील आहे. या महिलेने पतीला अद्दल घडवण्यासाठी केलेल्या उद्योगाने सगळी यंत्रणाच कामाला लागली. या महिलेच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. पती वेळ देत नसल्याने दोघांमध्ये सतत वाद विवाद होतात. याच वादावादीतून चिडलेल्या पत्नीने पती काम करत असलेल्या कंपनीला पतीच्या मेल आयडी वरून धमकीचा मेल केला. त्यामुळे कंपनीतल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं यानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली.

दहशतवादी संघटनेने पाठवावा असा धडकी भरवणारा मेल 

या महिलेने मुलाच्या टॅबमध्ये सेव्ह असलेल्या पतीच्या मेल आयडी वरून तो काम करत असलेल्या कंपनीला मेल  पाठवला. एमए इंग्लिश असलेल्या या महिलेने एखाद्या दहशतवादी संघटनेने पाठवावा असा धडकी भरवणारा मजकूर या मेल मध्ये लिहिला. कंपनीच्या तक्रारीनंतर चंदनवाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. यावेळी हा मेल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने केल्याचे तपासात उघड झाले.  वेळ न देणाऱ्या नवऱ्याला चांगली अद्दल घडावी. त्याची नोकरी जावी. पोलिसांनी त्याची चौकशी करावा. या सगळ्यामुळे त्रास व्हावा असा या मागचा उद्देश असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. पतीसाठी लावलेल्या सापळ्यात आता ही महिलाच अडकली आहे.