पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि.... व्हिडीओ

प्रेमाला आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं...73 वर्षांचा नवरदेव पुन्हा चढला बोहोल्यावर

Updated: Feb 22, 2022, 03:43 PM IST
पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि.... व्हिडीओ title=

पुणे, झी 24 तास, हेमंत चापुडे : पुण्यात आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. पुण्याच्या जुन्नरमध्ये आईवडिलाच्या 50 व्या लग्नदिनाच्या निमित्ताने मुलांनी आई वडिलांचे पुन्हा विवाह करुन हा दिवस साजरा केला. यावेळी या वयोवृद्ध वराचे वय हे 73 असून त्यांच्या या विवाह सोहळ्यात नातवंडांनी सुद्धा सहभाग घेतला. 

लग्नातील हळद, साखरपुडा या सर्व विधी करत हा विवाह सोहळ अगदी थाटात साजरा करण्यात आला. लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाला पुन्हा जंगी विवाह सोहळा रंगल्याचं पाहायला मिळालं. 

वयाच्या 73 व्या वर्षी आई-वडिलांचे मुलांनी पुन्हा लग्न लावत दिले अनोखे गिफ्ट दिलं आहे. या अनोख्या लग्नात डीजेच्या तालावर नातेवाईक नाचले सगळ्यांनी आनंद साजरा केला.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. 73 वर्षीय वर रामदास थोरवे आणि 68 वर्षीय वधू माणिकबाई थोरवे यांच्यात हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

लग्नाच्या 50 व्या वाढदिवशी मुलांमुलींना नातेवाईकांनी आपल्या आई-वडिलांना सुखद धक्का देत अनोखं सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. वर रामदास आणि वधु माणिकबाई यांचा 1972 च्या दुष्काळात विवाह संपन्न झाला होता. 

अगदी हालाखीच्या परिस्थितीत अपार मेहनत परिश्रम करत आयुष्याची सुखी संसाराची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानंतर कुटुंबीयांनी आपल्या आई-वडिलांना हा सुखद धक्का दिला.

आयुष्यात चढ-उतार चालू असतात त्यामुळे आताच्या काळात समाजात पती-पत्नी दाम्पत्यामध्ये होत असलेल्या कलाहातून सामंजस्याने समजुतदारपणाने मार्ग काढत सुखी संसार करण्याचा आजच्या तरुणाईला सल्ला दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना वधू-वर दोघांनाही अश्रू अनावर झाले. या निमित्तानं एक वेगळा सोहळा पाहायला मिळाला.