पुण्यात पोलीस आता सायकलवर पेट्रोलिंग करणार

पालिका प्रशासनाचा प्रस्तावाला ग्रीन सिग्नल

Updated: Mar 19, 2021, 08:59 PM IST
पुण्यात पोलीस आता सायकलवर पेट्रोलिंग करणार title=

किरण ताजणे, पुणे : पुण्यात आता पोलीस सायकलवर पेट्रोलिंग करणार आहे. पालिका प्रशासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून दहा सायकल देत प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. दहा अद्यावत सायकलमध्ये स्टिक आणि बॉटल स्टॅण्डची व्यवस्था केली आहे. सोबतीला त्याच भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित देखील केली आहे. वाढते इंधन दर आणि पर्यावरणपूरक पेट्रोलिंग व्हावं या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सायकल पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील पेठांचा परिसर म्हणजे अगदी दाटीवाटीचा परिसर आहे. मोठी पोलीस वाहन आणि मुबलक वाहनांची संख्या बघता जास्तीच पोलिसांना पेट्रोलिंग करता येत नव्हतं. प्रत्यक्षात नागरिकांचा पोलिसांच्या बरोबरचा वावर अधिक वाढावा, नागरिकांना सुरक्षित वाटेल असा हा निर्णय असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. तर पोलिसांच्या फिटनेस आणि इंधन खर्चाच्या दृष्टीने देखील चांगला निर्णय ठरेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

सायकल पेट्रोलिंगचा असलेला उद्देश किती यशस्वी होणार याची उत्सुकता असली तरी दुसरीकडे हा सायकल पेट्रोलिंगचा प्रयोग हटके असल्यानं त्याची चर्चा पुण्यात होत आहे.