पुण्यातल्या बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केला तर कारवाई

पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान....

Updated: Sep 11, 2018, 09:17 PM IST
पुण्यातल्या बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केला तर कारवाई title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान....  शानदार सवारी असली तरी, आता फटाके फोडल्यासारखे आवाज करत गेलात, तर या बुलेट राजांविरोधात कारवाई होणार आहे. कानठळ्या बसवणाराआवाज काढणाऱ्या बुलेट विरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतलीय. बुलेट चालकाला किंवा मालकाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहेच. पण त्याचबरोबर गॅरेज मालकांवर देखील कारवाई होणार आहे. कारण, बुलेटचा मूळ सायलेन्सरचा आवाज मोठा नसतो. त्यात, बदल करून असा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवले जातात. त्यामुळं बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेजवरही कारवाई होणार आहे.

बुलेट राजा वाहतूक नियमांचे असे उल्लंघन करत असताना, एकूण पुणेकरच वाहतुकीचे नियम पाळण्यात बेशिस्त असल्याची आकडेवारी पुन्हा समोर आलीय.  जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत तब्ब्ल १० लाख लाख पुणेकरांनी वाहतुकीचे नियम मोडलेत. त्यांच्याकडून २२ कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. 

झेब्रा क्रॉसिंग पुढे थांबणाऱ्या  ३ लाख ३७ हजार ३८४ वाहन चालकांकडून ७ कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर, त्यापाठोपाठ हेल्मेट न घालणा-या ३७ हजार दुचाकी चालकांवर कारवाई करून 2 कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. एकूणच वाहतुकीच्याबाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय.