''ती म्हणाली पतीचा मृत्यू कोरोनाने झालाय'', पुणे पोलिसांनी तिला अटक करतांना सांगितलं, 'मृत्यू असा झालाय...'

आधी कोरोनामुऴे लोकांचा जीव जायचा आता कोरोनाच्या नावावर लोकांचे जीव जायला लागले आहेत, हे खरचं दुर्दैव आहे. 

Updated: Jun 7, 2021, 05:57 PM IST
''ती म्हणाली पतीचा मृत्यू कोरोनाने झालाय'', पुणे पोलिसांनी तिला अटक करतांना सांगितलं, 'मृत्यू असा झालाय...' title=

पुणे : कोरोनामुळे देशातील अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. ज्यामुळे लोकांच्या अगदी जवळची व्यक्ती दगावल्या गेल्या आहेत आणि त्यामुऴे काही लोकं संपूर्ण आयुष्य भर निराधार झाले आहेत. पंरतु जवळ्च्या व्यक्तीने हत्या करुन कोरोनावर नाव टाकले तर? कोरोना खरंच आता या गुन्हेगारांना वाचवण्याचे साधन बनले आहे का? आधी कोरोनामुऴे लोकांचा जीव जायचा आता कोरोनाच्या नावावर लोकांचे जीव जायला लागले आहेत, हे खरचं दुर्दैव आहे. परंतु गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या हुशारी पुढे, त्यांचा सुगाव लागणार नाही.

पुण्यातील उरुली देवाची येथीत ही घटना आहे. येथे 19 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्या महिलेने सगळ्यांना सांगितले की, तिच्या नवऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

24 मे ला सकाळी मनोहरचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर त्याची पत्नी अश्विनीने पोलिसांना कळवले. परंतु पोलिसांना आश्विनीच्या कहाणीवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आणि या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली. त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की, मनोहरला अनेक दिवसांपूर्वी कोरोना झाला होता आणि तो यातून बरा देखील झाला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला जेव्हा त्यांनी आश्विनीचे कॉल रेकॉर्ड चेक केले.

कॉल रेकॉर्डमुऴे सत्य बाहेर

पोलिस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने आश्विनीच्या कॉल रेकॉर्ड पाहिले तेव्हा त्यांना खुलासा झाला की, तिचा एक  गौरव सुतार नावाचा मित्र आहे. ज्याच्या सोबत ती तासन-तास बोलत बसायची. त्यांनंतर पोलिसांना समजले की, गौरव हा मनोहरच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय आणखी पक्का झाला. 

चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या समोर आले की, आश्विनी आणि गौरवचं नातं मैत्रीच्या पुढे गेल्याने त्यांनी मनोहरला मारायचे ठरवले. त्यासाठी गौरवने आश्विनीला झोपेच्या गोळ्यांचे पॅकेट आणून दिले. त्यातल्या काही गोळ्या दुधात टाकून मनोहरला त्यांनी बेशुद्ध केले आणि दोघांनी मिळून मनोहरचा गळा दाबून हत्या केली. या सगळ्या गोष्टीचा खुलासा होताच पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.