#MeToo बद्दल पुणेकर तरुणांना असं काही वाटतं...

 या मोहिमे विषयी पुण्यातील तरुणांनी आपली मतं मांडली आहेत. 

Updated: Oct 13, 2018, 11:21 PM IST
#MeToo बद्दल पुणेकर तरुणांना असं काही वाटतं... title=

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : मी टू विषयी सगळ्याच क्षेत्रात बोललं जातंय, या मोहिमे वर काही जण टीका देखील करतायत तर पाठींबा देखील दिला जातोय,,, या विषयी तरुणींचं काय मत आहे??  या मोहिमे विषयी पुण्यातील तरुणांनी आपली मतं मांडली आहेत.

नानांना अटक करण्याची मागणी 

अभिनेता नाना पाटेकर यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करणारं नवं पत्र अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मुंबई पोलिसांना पाठवले आहे.

नाना पाटेकर यांची ब्रेन मॅपिंग, नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी करावी, अशी तिची मागणी आहे.

नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, निर्माता समी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांचीही ब्रेन मॅपिंग, नार्को अॅनलिसीस आणि लाय डिटेक्टर चाचणी करावी, अशी मागणी तनुश्रीनं केलीय.

तनुश्रीनं नाना पाटेकरांविरोधात ११ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तनुश्रीनं नव्यानं मुंबई पोलिसांना हे पत्र पाठवलंय.