माथेरान येथील मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले

 मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. त्‍यामुळे पर्यटकांना मनस्‍ताप.

Updated: May 2, 2019, 10:20 PM IST
माथेरान येथील मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले title=

नेरळ : थंड हवेचे ठिकाण असलेल्‍या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे मात्र मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. बुधवारी माथेरानमधून पर्यटकांना घेऊन नेरळकडे निघालेल्‍या गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. त्‍यामुळे पर्यटकांना मनस्‍ताप सहन करावा लागला. 

भर उन्‍हातून बॅगा आणि आपली चिमुरडी मुले घेऊन दीड किलोमीटरची पायपीट पर्यटकांना करावी लागली. पुढे घाटरस्त्यावर टॅक्सी पकडून हे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यांनतर पुन्हा सहा तासांनी गाडी रुळावर आली. या मिनीट्रेनची दुपारची एक प्रवासी फेरी रद्द करण्यात आल्याने नेरळ इथे प्रवाशांना तिष्‍ठत बसावे लागले. गेल्या पंधरा दिवसांत मिनीट्रेन घसरण्‍याची ही दुसरी घटना आहे.