नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. 

Updated: Mar 27, 2021, 04:58 PM IST
नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा title=
File photo

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. 

सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. इथल्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झालीय. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावरून नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना येते.

नांदेडमध्ये काल ९७० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती, तर १४ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. नांदेड जिल्ह्यात ८ हजार ७१५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील ९३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात ६९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.