काँग्रेसच्या फलकावरून गायब झालेले विखे-पाटील पुन्हा अवतरलेत फलकावर

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा काँग्रेसच्या प्रचाराच्या फलकावरुन फोटो गायब करण्यात आला होता. मात्र, आता मतदारसंघात फिरत असलेल्या काही प्रचार वाहनांच्या फलकावर त्यांचा फोटो दिसून येत आहे. 

Updated: Apr 24, 2019, 09:06 PM IST
काँग्रेसच्या फलकावरून गायब झालेले विखे-पाटील पुन्हा अवतरलेत फलकावर title=

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रंगत वाढत चाललीय. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात कुणाचाही प्रचार करणार नसल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराच्या फलकावरुन त्यांचा फोटो गायब करण्यात आला होता. मात्र, आता मतदारसंघात फिरत असलेल्या काही प्रचार वाहनांच्या फलकावर त्यांचा फोटो दिसून येत आहे. 

एवढंच नाही तर राजकीय विरोधक असलेल्या विखे-थोरातांचा फोटो अगदी शेजारी शेजारी छापण्यात आलाय. अचानक फलकावर फोटो झळकू लागल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्यायत. दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील फलकावर पहिल्यांदाच बाळासाहेब विखेंचा फोटो पहावयास मिळाला. 

काँग्रेसच्या फलकावरून गायब झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा फलकावर अवतरलेत. मतदार संघात फिरत असलेल्या प्रचार वाहनांवर विखे आणि थोरात शेजारी शेजारी असल्याचे फोटो दिसून येतायत. गेल्या अनेक दिवसांपासून विखेंचा फोटो फलकावर नव्हता मात्र आता अचानक पुन्हा फलकावर विखे यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.