भिराच्या तापमानामागचं रहस्य आहे तरी काय?

सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मात्र देशभरात चर्चा होत आहे, ती रायगड जिल्ह्यातल्या भिराच्या तापमानाची.

Jaywant Patil Updated: Mar 30, 2018, 06:21 PM IST
भिराच्या तापमानामागचं रहस्य आहे तरी काय? title=

रायगड : सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मात्र देशभरात चर्चा होत आहे, ती रायगड जिल्ह्यातल्या भिराच्या तापमानाची. कारण भिरानं आठवडाभरात दोन वेळा 45 अंशांचा टप्पा पार केला आहे.  भिराच्या या वाढत्या तापमानाबाबत शंका निर्माण झालीय. त्यामुळे नव्यानं चाचपणी करण्याचा निर्णय हवामान खात्यानं घेतला आहे. जुन्या तापमापक यंत्राच्या बाजुलाच नवं यंत्र बसवण्यात आलं आहे. 

नवं यंत्र बसवण्यात आलं

दोन्ही तापमापक यंत्राच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. गेल्या तीस वर्षांपासून भिराच्या तापमानाची नोंद जुन्या तापमापक यंत्रानं केली जात आहे.