औरंगाबाद : रेल्वे सुरक्षा पोलिसांनी औरंगाबादहून एकास तात्काळ तिकीट आरक्षण प्रकरणात अटक केली. सोहेल अहमद याला औरंगाबादहून अटक करण्यात आलीय. हा मूळचा उत्तर प्रदेशच्या गोडा येथील रहिवासी आहे. औरंगाबादमध्ये तो ६ वर्षांपासून राहत होता. शहरातील बुड्डीलेन भागात शिलाईचं काम करत होता. त्याच्याकडे ३०सिमकार्ड मिळाले आहेत. दुबईतील हमीद अश्रफने एक सॉफ्टवेअर बनवलं होतं. त्यातून रेल्वेची वेबसाई हॅक करत होते. त्याच्याकडून सोहेल अहमदने लिंक घेतली होती, मुख्य आरोपी हमीदकडे असलेल्या ९३ जणांच्या नंबरपैकी एक नंबर असल्याचं पुढे आले आहे.
रेल्वेची आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक करुन तात्काळ तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एकाला औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडं तब्बल ३० सिमकार्ड सापडलेत. आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक करुन तिकीट बुकिंग करण्यात येत होते. याप्रकरणी तात्काळ तिकीटांचा काळाबाजार करणारा गजाआड करण्यात आले आहे. तातडीच्या कामासाठी प्रवास करणाऱ्यांना रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग सुविधेचा मोठा आधार असतो. पण आता तात्काळ तिकीटं म्हणजे मृगजळ झालंय. कारण आयआरसीटीची वेबसाईटच हॅक करणारं सॉफ्टवेअर दलालांच्या हाती लागले आहे.
Breaking news । रेल्वे सुरक्षा पोलिसांनी औरंगाबादहून एकास तात्काळ तिकीट आरक्षण प्रकरणात अटक केली । सोहेल अहमद याला औरंगाबादहून अटक करण्यात आली । हा मूळचा उत्तर प्रदेशच्या गोडा येथील रहिवासी आहे. https://t.co/Ct4fYeN6GF@RailMinIndia @PMOIndia @Central_Railway @KonkanRailway pic.twitter.com/8maXDbQcTd
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 25, 2020
दुबईतल्या हमीद अश्रफ नावाच्या आरोपीनं हे सॉफ्टवेअर बनवलंय. त्याची लिंक मिळवून औरंगाबादच्या सोहेल अहमद या एजंटनं तात्काळ तिकीटांचा काळाबाजार सुरु केला होता. त्यानं यासाठी तब्बल ३० मोबाईल सिमकार्ड मिळवले होते. आरपीएफला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धडक कारवाई करत सोहेल अहमदला अटक केली आहे, अशी माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दिली.
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यापैकी सोहेल याला अटक करण्यात आली असली तरी सोहेलसारखे अनेक दलाल अजूनही मोकाट आहे. या दलालांना पकडणे गरजेचे आहे. तरच रेल्वे प्रवाशांना तातडीच्या कामासाठी तात्काळ रेल्वे तिकीटे सहज मिळतील, अन्यथा दलालांच्या हातात ही तिकीटे असतील.