"पावसाने नेहमीच..."; अजित पवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच उपस्थितांना हसू अनावर

बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना हा प्रकार घडलाय

Updated: Oct 16, 2022, 12:59 PM IST
"पावसाने नेहमीच..."; अजित पवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच उपस्थितांना हसू अनावर title=

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातारा (Satara) येथे भर पावसात राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेली सभा सर्वांच्याच लक्षात राहिली आहे. साताऱ्यात  शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस (Rain) पडू लागला. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचं संबोधन सुरु ठेवलं. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते. यानंतर लागलेल्या निवडणुकीच्या (Election) निकालावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेचा प्रभाव पडल्याचे बोलले जात होते. आजही अनेक राजकारणी शरद पवार यांच्या त्या सभेचा उल्लेख करतात. (Rain has always supported Sharad Pawar says Ajit Pawar)

बारामतीत (Baramati) बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या प्रसंगाची आठवन करुन दिलीय. पावसाने नेहमीच शरद पवार आणि मला साथ दिलेली आहे असे अजित पवार म्हणाले. या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या 50 व्या वर्धापनदिना निमित्ताने झेंडा वंदनाचा कार्यक्रम अजित पवार बोलत होते.

"शिक्षण क्षेत्रात सातत्याने वेगळे बदल होत आहेत. अजून एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पावसालाही आता बरं वाटायला लागला आहे. पावसाने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे. तसेच मला सुद्धा साथ दिलेली आहे आणि ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अक्षरशः या भागामध्ये त्याकाळी येताना वाटमाऱ्या व्हायच्या. इथे कोणीही येत नव्हतं. वंजारवाडी, रुई सावळचा या भागात रात्री कोणीही यायला घाबरायचे. अक्षरशः भीती वाटायची लोकांना. ज्यावेळी विद्या प्रतिष्ठान सुरू झाले तेव्हा या ठिकाणी कशाला सुरू केली संस्था? असा प्रश्न अनेकांना पडला होता," असे अजित पवार म्हणाले.