अजित पवार यांचं हे चॅलेंज राज ठाकरे यांनी स्वीकारलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. 22 मे रोजी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. उद्या राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच इथं सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे. म्हणजेच अजित पवारांचं चॅलेंज राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 

Updated: May 19, 2022, 10:15 PM IST
अजित पवार यांचं हे चॅलेंज राज ठाकरे यांनी स्वीकारलं title=

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. 22 मे रोजी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. उद्या राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच इथं सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे. म्हणजेच अजित पवारांचं चॅलेंज राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 

राज ठाकरे यांनी सकाळी सभा घेऊन दाखवावी, असं आव्हान अजित पवार यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. आता राज ठाकरेंची सभा सकाळी दहा वाजता होणार आहे.

'पावसाच्या वातावरणामुळे पुण्यातील 21 मे रोजी होणारी सभा रद्द झाली होती. ती आता बंदिस्त सभागृहात 22 मे रोजी होणार आहे. आम्ही कोणाला उत्तर द्यायला सभा घेत नाही आहोत आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. आमच्या नंतर अनेक लोक पत्रकार परिषद, सभा घ्यायला लागले आहेत.' असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.