Rajmata Jijau Jayanti 2024 Wishes: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मेसेजेस, WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण मेसेजेस, ईमेजेस, व्हॉट्सअप स्टेट्सच्या रुपात शुभेच्छा देऊन जिजाऊ यांच्या स्मृतींना उजाळा देऊ शकता. 

Updated: Jan 11, 2024, 08:25 PM IST
Rajmata Jijau Jayanti 2024 Wishes: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मेसेजेस, WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा title=

Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती असते. राजमाता जिजाबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत. अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसह अन्य सोशल मीडियाचा वापर करुन शुभेच्छा पाठवू शकता.  

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. लघुजी जाधव आणि म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करु शकले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण मेसेजेस, ईमेजेस, व्हॉट्सअप स्टेट्सच्या रुपात शुभेच्छा देऊन जिजाऊ यांच्या स्मृतींना उजाळा देऊ शकता. त्यासाठी काही निवडक शुभेच्छा पुढीलप्रमाणे :

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मेसेजेस

अखंड स्वातंत्र्याची प्रेरणा
राजमाता जिजाऊ मांसाहेबांना
जयंतीदिनी त्रिवार मुजरा !

स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या
राजमाता जिजाऊ
माँसाहेब यांना जयंतीनिमित्त
कोटी कोटी वंदन आणि मानाचा मुजरा !

जिजाऊ तुम्ही नसत्या तर, नसते झाले शिवराय नी शंभु छावा 
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा 
जिजाऊ तुम्ही नसत्या तर, नसते लढले मावळे
जिजाऊ तुम्ही नसत्या तर, नसते दिसले विजयाचे सोहळे
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला 
साक्षात होती ती आई भवानी
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!

धन्य ती माता जिजाबाई
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज
धन्य धन्य ते स्वराज...
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

स्वराज्याचा जिने घडविला विधाता, 
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता !!
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।। 
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा