सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी

सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Updated: Nov 15, 2017, 06:41 PM IST
सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी title=

 कोल्हापूर : सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, शेवगावमधल्या हिंसक आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरी आणि कारखानदारांसोबत चर्चा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, या बैठकीला  आयुक्तांसह पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकरीही उपस्थित आहेत. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक सुरू आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक आंदोलनंतर तोडगा काढण्यासाठी ही बैठक सुरू आहे. त्यामुळं या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय.

या प्रकरणामुळे शेतकरी आणखीनच पेटले आंदोलन अनियंत्रीत झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, ७ गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि पैठणमध्ये ऊसाला 3100 रूपयांचा दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.