रत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता

Ratnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.

Updated: Aug 27, 2024, 11:11 AM IST
रत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता title=
rape on 19 years old Nursing Student on way to Home in Ratnagiri

Ratnagiri Crime News: कोलकाता येथील आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार व बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता रत्नागिरीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रत्नागिरीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णालयातील परिचारिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कोलकत्ता बलात्कार प्रकरण आणि बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरातून संपात व्यक्त केला जात आहे. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत असतानाही असे प्रकार सुरूच असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात दररोज एकतरी अत्याचाराचा गुन्हा समोर येत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही असाच प्रकारचा गुन्हा उघडकीस आला आहे. रिक्षा चालकाने 19 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकरणामुळं रत्नागिरीत तणावाचं वातावरण आहे. 

नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झालं आहे. सदर तरुणीही निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सापडली होती त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. तरुणी अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथेच पीडित तरुणीवर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. 

तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील परिचारिकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी काम बंद करून रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाजदेखील बंद केले आहे.