खरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा

अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी खुलासा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 12, 2024, 10:50 PM IST
खरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा title=

MP Bajrang Sonawane: बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचा पराभव करुन विजयी झालेले बजरंग सोनवणे हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.  बीडमधले शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला होता.  बजरंग सोनावणे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं होतं.त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच बजरंग सोनवणे यांनी ‘अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?’, असा सणसणीत टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. .माझा विजय होणार होता म्हणून मी संयमाने होतो...मात्र, शेवटपर्यंत त्रास द्यायचा काम विरोधकांन केलं...बीडची जनता सोबत असल्यामुळे विजय झाल्याची प्रतिक्रिया सोनावणे दिलीय...आता बीडचं राजकारण आम्हाला विचारल्याशिवाय यापुढे होणार नाही...असं म्हणत बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना आव्हान दिले.

कोण आहेत बजरंग सोनवणे?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. बजरंग सोनवणेंचा 1 लाख 68 हजार मतांनी पराभव करत प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे याचे निकटवर्तीय होते. तसेच ते अजित पवार यांच्या देखील जवळचे होते.  ऐन निवडणुकीच्या तोंडावरुन  बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.