वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, यासाठीची आरटीओतील पायपीट थांबणार

RTO Registration Certificate : वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी. तुम्ही गाडी घेत असाल तर नोंदणीसाठी... 

Updated: Oct 23, 2021, 01:43 PM IST
वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, यासाठीची आरटीओतील पायपीट थांबणार

मुंबई : RTO Registration Certificate : वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी. तुम्ही गाडी घेत असाल तर नोंदणीसाठी (Vehicle registration) आता तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरबसल्या गाडीची नोंदणी करु शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जुन्या वाहन खरेदीनंतरची नोंदणी करु शकता. तशी सुविधा  RTO ने उपलब्ध करुन दिली आहे. (Now, no need to visit RTO for registration certificate)

आता जुन्या दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही ऑनलाईन करणे सहज शक्य आहे. (Maharashtra's vehicle registration process online) तसेच घरबसल्या नवे आरसीबुक मिळणार आहे. गाडी ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममध्ये ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची आरटीओतील पायपीट थांबणार आहे. वाहन खरेदीनतंरची नोंदणी आता घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे. जुन्या चारचाकी, दुचाकी गाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाईन लर्निंग लायसन्सच्या धर्तीवर जुन्यावाहन खरेदीची नोंदणी करता येणार आहे. परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना एनआयसीला दिल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांची आरटीओ कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. आरटीओ कार्यालयातील दलालांनाही याचा दणका बसणार आहे.