इंदूरीकर महाराजांना दिलासा, तो व्हिडिओ यूट्युबवर नसल्यामुळे कारवाई नाही

कीर्तनकार इंदूरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Feb 25, 2020, 10:58 PM IST
इंदूरीकर महाराजांना दिलासा, तो व्हिडिओ यूट्युबवर नसल्यामुळे कारवाई नाही title=

अहमदनगर : कीर्तनकार इंदूरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने सायबर सेलकडे इंदूरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिल होतं. अहमदनगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युट्युब वर उपलब्ध नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इंदूरीकर महाराजांवर सध्या तरी पीसीपीएनडी समितीकडून कसलीही कारवाई होणार नाही.

कीर्तन करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल इंदूरीकर महाराजांना गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांना नोटीस पाठवण्यात आली. सम तिथीला स्त्री सोबत संग झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला संग केला तर मुलगी होते, असं इंदूरीकर म्हणाल्याची तक्रार करण्यात आली होती.

ओझर येथे आपल्या कीर्तनात केलं केलेलं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे, तसंच PCPNDT कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन आहे, असा आरोप करण्यात आला होता. यानंतर PCPNDT सल्लागार समितीनं निवृत्ती महाराज इंदूरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला.

हा वाद वाढल्यानंतर इंदूरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली होती. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदुरीकर महाराज यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं होतं.